लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या लेट्स मीट क्लब ऑफिसर्स ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न
पिंपरी-चिंचवड : सामाजिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासाला चालना देणाऱ्या लेट्स मीट क्लबच्या वतीने क्लब ऑफिसर्स ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, ३० मे २०२६ रोजी करण्यात आले. हा कार्यक्रम पुनावळे येथील ब्ल्यू वॉटर मल्टिक्युजिन रेस्टॉरंटमध्ये दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत पार पडला.
कार्यक्रमामध्ये विविध २९ क्लबच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या, नेतृत्व कौशल्ये, संघटन व्यवस्थापन आणि सदस्य विकास याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अनुभवी मार्गदर्शकांनी प्रभावी नेतृत्व, संवादकौशल्य आणि क्लबच्या यशस्वी कार्यपद्धतीबाबत सविस्तर माहिती दिली.
संध्याकाळी ७ नंतर लेट्स मीट सदस्यांसाठी विशेष स्नेहमेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक गणेश शिंदे यांनी काळाची गरज ओळखून समाज कार्य हाती घेण्यासाठी मार्गदर्शन केले . या कार्यक्रमामुळे विविध क्लबमधील पदाधिकाऱ्यांना परस्पर संवाद साधण्याची आणि नेटवर्किंगची संधी मिळाली.
कार्यक्रमाचे संयोजक दीपकजी शहा, गव्हर्नर दीपक लोया, समन्वयक अशोक मिस्त्री, सचिव उत्कर्ष गांधी, तसेच दमाजी आसबे, प्रवीण खुले, आनंद आंबेकर,सुनिल चेकर,आणि विलास मुळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास विविध लायन्स क्लब चे मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सर्व उपस्थितांना विशेष टी-शर्ट देण्यात आला. सहभागी सदस्यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे नेतृत्व विकास आणि संघटनात्मक बळकटीस मोठी मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.
0 Comments