UID= Samajik Aadhawa Weekly Newspaper | Maharashtra News
  • India
  • Last Update 11.30 am
  • 29℃ Pune, Maharastra
news-details
सामाजिक

बालगंधर्व परिवार ट्रस्ट च्या वतीने महिला कलाकारांसाठी स्नेहमेळावा श्री मेघराज राजेभोसले

बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र यांच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराचा तीन दिवसीय भव्य वाढदिवस, वर्धापन दिन सोहळा साजरा केला जातो, जगात एखाद्या वास्तूचा असा वाढदिवस साजरा करण्याची दुर्मिळ गोष्ट म्हणावी लागेल, कलाकारांचे हे एक संमेलन किंवा आनंद मेळावाच म्हणावे लागेल,हा सोहळा जून महिन्यात दिनांक २५/२६/२७ या तारखांना सकाळी ८ ते रात्री १. या वेळात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संपन्न होत असतो.त्या नंतर वर्षभर कलाकारांच्या हिताचे विविध उपक्रम राबविले जातात, कलाकारांसाठी आरोग्य शिबिरे, वृद्ध कलाकारांना शासकीय मानधन मिळावे या साठी पाठपुरावा, कलाकारांना म्हाडाच्या सदनिका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न, कलाकार माता -पिता कृतज्ञता सन्मान सोहळा, कलाकारांच्या मुलांना शालेय वस्तूंचे वाटप,लावणी वर्कशॉप,लोककला संगोपन, कलाकारांसाठी उद्योग व्यवसाय,महिला कलाकारांसाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात, त्यातील एक भाग म्हणून महिला कलाकारांसाठी खास मकरसंक्रांतीचे औचित्य साधून महिला कलाकार स्नेह मेळावा व तिळगूळ वाटप , संक्रांतीचे वाण वाटप समारंभ त्या निमित्ताने प्रसिद्ध बोलक्या बाहुल्यांच्या कलाकार, अभिनेत्री चैत्राली माजगांवकर-भंडारी यांचा खास महिलांसाठी होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या मध्ये पहिल्या तीन विजेत्यांना मानाची पैठणी साडी व विशेष बक्षिसे देण्यात येणार असून,सोबत उपस्थित महिला कलाकारांसाठी बंपर २५ लकी ड्रॉ च्या माध्यमातून बक्षिसे देण्यात येणार आहेत,त्यात तब्बल अकरा पैठणी साड्या,सहा नथ, महिला कलाकारांसाठी मेकअप करण्याच्या दृष्टीने तीन फॅन, तीन मिक्सर, तीन बेडशीट, महिला कलाकारांसाठी एक विशेष मेकअप किटची व्हॅनिटी अशी तब्बल २५ पेक्षा जास्त लकी ड्रॉ बक्षिसे देण्यात येणार असून महिला कलाकारांनी दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी सहभाग घेऊन एक दिवस स्वतः साठी मनसोक्त जगण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी चित्रपट, मालिका,नाटक, लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, लोककलावंत महिला,कलाक्षेत्रात विविध विभागात कार्यरत असणाऱ्या महिला कलाकारांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र राज्य चे संस्थापक -अध्यक्ष श्री मेघराज राजेभोसले (भैय्या) यांनी केले असून,या महिला मेळाव्यासाठी अनेक सेलिब्रिटी महिला कलाकार व मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.महिलांसाठी हा स्नेहमेळावा सोमवार दिनांक १९ जाने २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर कॅफेटेरिया येथे महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून जास्तीत जास्त महिला कलाकारांनी याचा आनंद लुटावा असे आवाहन बाप चे अध्यक्ष श्री मेघराज राजेभोसले यांनी केले आहे.

You can share this post!

0 Comments

Leave Comments