UID= Samajik Aadhawa Weekly Newspaper | Maharashtra News
  • India
  • Last Update 11.30 am
  • 29℃ Pune, Maharastra
news-details
वित्त

आदित्याज्‌ किचन एन फर्निचरचे म्हाळुंगेत तिसरे दालन सुरू

पुणे, २३ ऑगस्ट २०२६ : मॉड्युलर किचन्स आणि आधुनिक घरगुती फर्निचर क्षेत्रातील विश्वासार्ह नाव असलेल्या आदित्याज्‌ किचन एन फर्निचरचे तिसरे शोरूम म्हाळुंगे येथे ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले. गोदरेज हिलसाईड वन, शॉप नं. १३, म्हाळुंग, बाणेर ॲनेक्स, म्हाळुंगे येथे सुरू झालेल्या या दालनाचे उद्घाटन पुणे व्यापारी संघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्या हस्ते झाले.

यावेळी आदित्याज्‌ किचनचे संचालक आनंद आंबेकर, आदित्याज्‌ किचन सिस्टिमच्या पार्टनर सपना आनंद आंबेकर, तसेच श्रीमती भारती आंबेकर यांच्यासह कविता बगाडे, आयुर्वेदाचार्य डॉ. विक्रांत जाधव, रमेश शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी फत्तेचंद रांका म्हणाले, “आदित्याज्‌ किचन एन फर्निचर हे किचन आणि फर्निचर क्षेत्रातील अग्रगण्य नाव असून, तीन दशकांहून अधिक काळ ग्राहकांचा विश्वास कंपनीने संपादन केला आहे. पुण्यासह देशातील २० शहरांमधील समाधानी ग्राहक हेच कंपनीचे खरे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.”

म्हाळुंगे येथील नवीन शोरूमच्या माध्यमातून हिंजवडी परिसरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार असल्याचे आनंद आंबेकर यांनी सांगितले. या शोरूममध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार मॉड्युलर किचन, वॉर्डरोब, बेड, टीव्ही युनिट, किचन फिटिंग्ज तसेच विविध प्रकारचे आधुनिक घरगुती फर्निचर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

भारतीय कुटुंबांच्या गरजा, जीवनशैली आणि उपलब्ध जागेचा विचार करून आदित्याज्‌चे फर्निचर डिझाईन केले जाते. पारंपरिक सुतारकामाच्या तुलनेत अधिक टिकाऊपणा आणि मॉलमधील महागड्या फर्निचरच्या तुलनेत किफायतशीर किंमत हे कंपनीच्या उत्पादनांचे वैशिष्ट्य असल्याचे आंबेकर यांनी स्पष्ट केले.

कंपनीच्या फर्निचरमध्ये आवश्यकतेनुसार लाकडाऐवजी दीर्घकाळ टिकणाऱ्या ट्युब्यूलर स्टील स्ट्रक्चरचा वापर केला जातो. तसेच इन्स्टॉलेशननंतरची सेवा, ग्राहकांच्या गरजेनुसार डिझाईन आणि फर्निचर सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येणे ही उत्पादनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.

सपना आंबेकर यांनी सांगितले की, दोन बेडरूमच्या फ्लॅटसाठी आदित्याज्‌ फर्निचरची रेंज सुमारे ६ लाख रुपयांपासून सुरू होते. विविध मटेरियल्सचे योग्य संयोजन करून ग्राहकांच्या आवडीनुसार, गरजेनुसार आणि बजेटनुसार फर्निचर निवडण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

आदित्याज्‌ किचन सिस्टिमने आतापर्यंत देशातील विविध राज्यांमध्ये २५ हजारांहून अधिक किचन सिस्टिम्स आणि घरगुती फर्निचर बसवले आहे. पुण्यातील सुमारे १० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या अत्याधुनिक उत्पादन केंद्रात ९५ टक्क्यांहून अधिक उत्पादन इन-हाऊस केले जाते. कंपनीने १९९५ पासून आतापर्यंत या प्रकल्पात सुमारे १० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून वार्षिक उत्पादनक्षमता १,००० वरून १,२०० युनिटपर्यंत वाढवण्यात आली आहे.

कंपनीच्या चॅनेल्स, बिजागऱ्या, चाके आणि स्टेनलेस स्टील ३०४ ग्रेड अॅक्सेसरीजवर लाईफटाईम वॉरंटी देण्यात येते. आगामी पाच वर्षांत पुण्यात आणखी पाच आऊटलेट सुरू करण्याचे कंपनीचे नियोजन असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

अधिक माहितीसाठी :
श्री. आनंद आंबेकर, संचालक
आदित्याज्‌ किचन एन फर्निचर
मोबा. +91 98221 90559



#AdityasKitchenAndFurniture, # AdityasKitchen, # ModularKitchen, # ModularKitchenPune, # FurniturePune, # HomeFurniture, # ModernFurniture, # KitchenDesign, # KitchenFurniture, # InteriorDesignPune, # HomeInteriors, # PuneBusiness, # PuneUpdates, # Mhalunge, # MhalungePune, # BanerPune, # Hinjewadi, # HinjewadiPune, # PuneNews, # FurnitureDesign, # IndianFurniture, # MadeInPune, # PuneEntrepreneurs, # BusinessNews, # MaharashtraBusiness, # KitchenDesignPune, # FurnitureDesignPune, #,

You can share this post!

0 Comments

Leave Comments