UID= Samajik Aadhawa Weekly Newspaper | Maharashtra News
  • India
  • Last Update 11.30 am
  • 29℃ Pune, Maharastra
news-details
सामाजिक

विश्वकर्मा कारागिरांच्या वस्तूचे राज्यस्तरीय प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन

विश्वकर्माने डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल टाकून स्वतःची ओळख निर्माण करावी- रवींद्र साठे कौशल्य विकासाच्या योजनेच्या माध्यमातून कारागिरांना स्वावलंबनाची संधी उपलब्ध झाली आहे; डिजिटल इंडियाच्या दिशेने प्रत्येक विश्वकर्माने पाऊल टाकून स्वतःची ओळख निर्माण करावी,असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी केले. भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या विकास व सुविधा कार्यालय, मुंबई आणी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान सोनल हॉल प्रदर्शन सेंटर, कर्वे रोड येथे आयोजित विश्वकर्मा कारागिरांच्या राज्यस्तरीय प्रदर्शन, विक्री व प्रोत्साहन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या विकास व सुविधा कार्यालयाचे संचालक मिलिंद बारापत्रे, इंडो जर्मन टूल रूमचे उपाध्यक्ष सुहास इंगळे, एक्सेलन्सीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत सारडा, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी, एमएसएमईचे सहसंचालक अभय दफ्तरदार, जिल्हा सुकाणू समिती सदस्य विकास जगताप, धर्मेंद्र खांडरे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. साठे यांनी ‘लोकल फॉर व्होकल’ संकल्पनेद्वारे विश्वकर्मा कारागिरांनी दर्जेदार उत्पादने निर्माण करून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवावे तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया आणि विश्वकर्मा योजना राबविण्यात येत आहेत. ते पुढे म्हणाले, विश्वकर्मा कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे व त्यांचे सक्षमीकरण करणे हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश होता. प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून पुणेकरांनी या तीन दिवसीय मेळाव्यास भेट देऊन स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन श्री. साठे यांनी केले. प्रदर्शनामध्ये कारागिरांचे ६७ स्टॉल्स प्रदर्शनामध्ये सुतारकाम, लोहारकाम, सोनारकार, माळाकार, कुंभार, शिल्पकार, शिवणकाम, चर्मकार, बुटिक काम, कोरीव दगड काम, खेळणी आदी विविध पारंपरिक व्यवसायातील एकूण ६७ स्टॉल्स सहभागी झाले होते. कोल्हापुरी चप्पल, पर्स, दर्जेदार बुटिक साड्या, गारमेंट वस्तू तसेच महिलांसाठी आकर्षक दागिने यांना विशेष प्रतिसाद मिळत आहे. प्रस्ताविकात सहसंचालक श्री. दफ्तरदार यांनी विविध योजनेची भूमिका स्पष्ट केली. श्रीमती कोठारी यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. श्री. बारापत्रे यांनी प्रदर्शनाचे महत्त्व विषद केले. श्री. जगताप यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य समन्वयक श्री. अभय रावेतकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग यांनी केले.

#विश्वकर्माप्रदर्शन, # राज्यस्तरीयमेळावा, # खादीग्रामोद्योग, # MSMEIndia, # कौशल्यसन्मानयोजना, # लोकलफॉरव्होकल, # DigitalIndia, # StartupIndia, # MakeInIndia, # विश्वकर्मायोजना, # कारागिरसक्षमीकरण, # स्वावलंबीभारत, # PuneEvents, # हस्तकला, # ग्रामीणउद्योग, # samajikaadhawa,

You can share this post!

0 Comments

Leave Comments