मुबई दि.१७.०३.२०२६ राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवाच्या मदतीसाठी "मुख्यमंत्री सहायता निधी " द्वारे मदत करण्यात आली आहें
महाराष्ट्र राज्य केमिस्टस् अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन ही राज्यातील १,२५,००० औषध विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. संघटनेने आपल्या सभासदांकरिता कार्य करित असतांना नेहमीच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवलेली आहे. देशावर अथवा राज्यावर ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती ओढवली असेल अथवा कोरोना सारख्या विषाणुचा प्रादुर्भाव असेल अशा प्रत्येक वेळी संघटनेने मदतीचा हात पुढे केला आहे.
महाराष्ट्र राज्यात यावर्षी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे यासह काही अन्य भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे. यातील काही शेतकरी बांधवांना संघटनेच्या मार्फत आर्थिक सहकार्य केलेले आहे.
सामाजिक जाणीव व आपले कर्तव्य समजून राज्य संघटनेच्या बहुतांश जिल्ह्यातील सभासदांनी यासाठी उत्स्फुर्तपणे मदत केली असून राज्य संघटनेच्या वतीने रु.२,००,००,०००/- (दोन करोड) रुपयांचा धनादेश "मुख्यमंत्री सहायता निधी" च्या नावे धनादेश सुपुर्द करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमास राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रसाने, अखिल भारतीय औषध संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे , खजिनदार वैजनाथ जागुष्टे, हुकुमराज मेहता, सुनीलजी छाजेड उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे समन्वयन केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव अनिल बेलकर यांनी केले.
0 Comments