UID= Samajik Aadhawa Weekly Newspaper | Maharashtra News
  • India
  • Last Update 11.30 am
  • 29℃ Pune, Maharastra
news-details
शासकीय

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम वेळेत पूर्ण करण्याकरिता राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरु असून याद्या परिपूर्णरित्या तयार व्हाव्यात यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे. त्यां याद्या विहित कालमर्यादेत परिपूर्ण होण्याकामी राजकीय पक्षांनी देखील योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षाच्या बैठकीत उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर म्हणाल्या, जिल्ह्यात एकूण ९० लाख ८० हजार १७३ मतदार आहेत, त्यापैकी ६२ लाख ३६ हजार ६७१ इतक्या मतदारांची माहिती बीएलओ ॲपवर संगणकीकृत करण्यात आली आहे. उर्वरित मतदारांची संगणकीकृत करण्याकरिता मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी सहकार्य करावे. पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय पक्षानी आपल्या मतदारसंघातील नावे बारकाईने तपासून घ्यावी, सर्व पात्र मतदाराचे नाव या यादीत येईल, यादृष्टीने प्रशासन काम करीत आहेत. या बैठकीत नमुना क्रमांक ६, ७ व ८ चे अवलोकन करुन मतदार यादी अद्यावतीकरणाकरिता उपयोग करावा, याबाबत अधिक माहिती हवी असल्यास निवडणूक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती कळसकर म्हणाल्या. यावेळी तहसीलदार शीतल मुळे तसेच जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट), नॅशनल पीपल्स पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या शंकांचे श्रीमती कळसकर यांनी निरसन केले.

#मतदारयादी #विशेषपुनरीक्षण #मतदारनोंदणी #ElectionCommission #ECI #VoterList #VoterRegistration #मतदारजागृती #लोकशाही #Democracy #Voting #मतदान #BLO #BLOApp #निवडणूक #मतदार #जिल्हाप्रशासन #JitendraDudi #पुणेजिल्हा #PuneDistrict #राजकीयपक्ष #VoterAwareness #ElectoralRoll #IndiaVotes #सशक्तलोकशाही,

You can share this post!

0 Comments

Leave Comments