शेठ हिरालाल सराफ प्रशाला बुधवार पेठ पुणे.दिनांक 28 -2 -2026 रोजी प्रशालेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. प्रथम शाळेच्या विज्ञान प्रयोगशाळेमध्ये भरवलेले विज्ञान प्रदर्शन पाहुण्यांना दाखवण्यात आले आणि त्यातील अनेक प्रयोग श्रीम . पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना करून दाखवले व त्या विषयी माहिती दिली " माननीय मुख्याध्यापिका हवलदार मॅडम यांच्या नियोजन प्रमाणे विज्ञान शिक्षिका- सौ- पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्रशस्त हॉलमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या भारत मराठी विद्यालयाच्या सदस्य -सौ -विशाखा विजय भुरके मॅडम या होत्या तर अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका - सौ हवलदार मॅडम उपस्थित होत्या.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय भारत मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री . वाघुलकर सर यांनी करून दिला . प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून मुलांना विज्ञान विषयाची गोडी कशी लागावी याविषयी मार्गदर्शन केले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका- हवालदार मॅडम यांनी सुद्धा मुलांना थोर महान भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या मौलिक संशोधनाबद्दल माहिती सांगितली.
शेवटी आभार प्रदर्शन शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री- थोरात सर यांनी केले फोटोसेशनचे सर्व काम सौ- खानापुरे मॅडम यांनी केले अशाप्रकारे शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले
0 Comments