शेठ हिरालाल सराफ प्रशाला बुधवार पेठ पुणे चा १०४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
शुक्रवार दिनांक ०६ मार्च २०२६ रोजी प्रशालेच्या प्रांगणामध्ये शेठ हिरालाल सराफ प्रशालेचा १०४ वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा झाला.
डॉ . निरगुडकर सरांनी प्रशालेचा भूतपूर्व इतिहास मोजक्या परंतु मौलिक शब्दात सांगितला आणि त्याची आजच्या परिस्थितीशी कशी सांगड घालावी याचे पण सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. माननीय कार्यवाह डॉ . गवळी सर यांनी संस्थेची प्रगती आणि त्यामध्ये असणाऱ्या विद्या शाखा यांची घोडदौड कशाप्रकारे प्रगतीपथावर आहे याची ओळख करून दिली. त्यानंतर संस्थेच्या नियमक मंडळाच्या अध्यक्षा डॉ . गरवारे मॅडम यांनी प्रशालेत चालणाऱ्या विविध उपक्रम, विविध प्रकारच्या अडचणी , समस्या त्यावर उपाय, याविषयी छान मार्गदर्शन केले. तसेच प्रशालेत मागील दोन वर्षापासून झालेल्या भौतिक सुविधांचा आढावा त्यांनी आपल्या मनोगतामधून छान प्रकारे टिपला. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने श्री . विलासजी टापरे यांनी शालेय जीवनातील तत्कालीन आठवणींना उजाळा देत सद्याची शालेय परिस्थिती समजावून सांगितली " तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ . हवालदार मॅडम यांनी सुद्धा आपल्या मनोगतामधून प्रशालेच्या होत असलेल्या प्रगतीचा आलेख मोजक्या शब्दात कथन केला. जिल्हा परिषद पुणे आयोजित यशवंतराव चव्हाण बालनाट्य स्पर्धा -द्वितीय क्रमांक आणि वनराई पर्यावरण मंडळ संस्था वनराई अंतर्गत- पथनाट्य -प्रथम क्रमांक आणि संयम ओलिंपियाड स्पर्धेत पुण्यातील २३५ शाळांमध्ये टॉप टेन शाळांमध्ये शाळेचा समावेश
तसेच विज्ञान विभागात इन्स्पायर अवार्ड मानंकणामध्ये बक्षीस मिळालेल्या विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचाही यथोचित सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री . प्रदीपजी सिंदेकर यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्व माजी विद्यार्थी तसेच सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यामुळे कार्यक्रम यशस्वी होण्यास फार मोठी मोलाची मदत झाली .
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ . मनिषा हवालदार मॅडम आणि माजी विद्यार्थी संघाचे- अध्यक्ष- श्री. प्रदीप सिंदेकर यांच्या मार्गदर्शक नियोजनानुसार कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली. विद्या प्रसारिणी सभा शिवाजीनगर पुणे- ५. या नामांकित संस्थेच्या नियामक मंडळाच्या पहिल्या महिला अध्यक्षा- डॉ . मृणालिनी गरवारे मॅडम, कार्यवाह डॉ. सतीशजी गवळी, सहकार्यवाह- श्री . विजयजी भुरके यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली . नियामक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य व प्रशालेचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी डॉ . हिरेन निरगुडकर , शेठ हिरालाल सराफ प्रशालेचे शाला समिती अध्यक्ष- श्री . केशवजी कुलकर्णी , भारत मराठी विद्यालयाचे शाला समिती अध्यक्ष-श्री . विलासजी टापरे तसेच प्रा . नाथ हरी पुरंदरे प्राथमिक विद्यालयाच्या शाला समिती अध्यक्षा सौ . विशाखा भुरके मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सांस्कृतिक प्रतिनिधी- सौ- जगताप मॅडम यांनी केले तर व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय प्रशालेचे शिक्षक प्रतिनिधी - श्री सुरवसे सर यांनी करून दिला.
0 Comments