UID= Samajik Aadhawa Weekly Newspaper | Maharashtra News
  • India
  • Last Update 11.30 am
  • 29℃ Pune, Maharastra
news-details
शासकीय

डीआरआय ने महाराष्ट्रात आणखी एक बेकायदा औषधनिर्मिती युनिट केले उद्ध्वस्त

अवैध मार्गाने नायजेरियाला पाठवल्या जाणाऱ्या गोळ्या जप्त; तीन मुख्य आरोपींना अटक

मादक द्रव्ये आणि मनोविकारकारक पदार्थांच्या अवैध उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय तस्करीविरोधात आपली सातत्यपूर्ण कारवाई सुरू ठेवत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) आफ्रिकन देशांमध्ये मनोव्याधीवरील सूचीबध्‍द औषधे- पदार्थ  असलेल्या ट्रॅमाडोल हायड्रोक्लोराईड गोळ्यांचे गुप्तपणे उत्पादन, लपवाछपवी आणि अवैध निर्यात करणाऱे एक संघटित नेटवर्क उद्ध्‍वस्त केले  केला. 

गुप्तचर माहितीवर आधारित या आठवडाभर चाललेल्या कारवाईत एक लाख ट्रॅमाडोल हायड्रोक्लोराईड गोळ्या, एक लाख टॅपेंटाडोल गोळ्या तसेच मनोव्याधीवर उपयुक्त ठरणारी औषधे, त्यासाठी लागणारे  पदार्थ तसेच  गुप्त उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री आणि कच्चा माल जप्त करण्यात आला असून या टोळीच्या तीन प्रमुख सदस्यांना अटक करण्यात आली आहे.

दिनांक 02.08.26 रोजी मिळालेल्या  गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या एका कारवाईत डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबई एअर कार्गो कॉम्प्लेक्स येथे नायजेरियाला जाणारा  निर्यात माल अडवला. या निर्यात मालामध्ये प्रेगाबालिन कॅप्सूल - 300 मिग्रॅ असल्याचे घोषित करण्यात आले होते. तथापि, सखोल तपासणीअंती या निर्यात मालामध्ये लपवून ठेवलेल्या 1 लाख ट्रॅमाडोल हायड्रोक्लोराईड 250 मिलीग्रॅमच्या गोळ्या (वजन अंदाजे 25 किलो) आणि 1 लाख टॅपेंटाडोल 200 मिग्रॅच्या गोळ्या (वजन अंदाजे 20 किलो) जप्त करण्यात आल्या.

डीआरआयने केलेल्या वेगवान तपासामुळे अनेक टप्प्यांवर चालणारी एक सुसंघटित पुरवठा साखळी उघडकीस आली. ट्रॅमाडोलच्या गोळ्या महाराष्ट्रातील अंबरनाथ येथील एका कारखान्यात गुप्तपणे तयार केल्या जात होत्या आणि त्यांची ओळख लपवण्यासाठी साध्या पुठ्ठ्यांच्या खोक्यांमध्ये पॅक केल्या जात होत्या. त्यानंतर हा माल मुंबई एअर कार्गो कॉम्प्लेक्सजवळील एका गोदामात नेण्यात येत होता.या ठिकाणी तो पांढऱ्या गोण्यांमध्ये पुन्हा पॅक करून नायजेरियाला अवैध निर्यात करण्‍यासाठी सज्ज केला जात होता.

आठवडाभर चाललेल्या समन्वित पाठपुरावा मोहिमांच्या मालिकेत डीआरआय अधिकाऱ्यांनी निर्यातदार, उत्पादक, पुरवठादार, वाहतूकदार आणि साठवणुकीच्या गोदामाशी संबंधित अशा अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. उत्पादन सुविधेवरील शोधमोहिमेत मादक पदार्थांच्या बेकायदेशीर उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या टॅब्लेट कॉम्प्रेशन मशिनरीसह मोठ्या प्रमाणावर कच्चा माल जप्त करण्यात आला.

या कारवाईच्या अखेरीस आयईसी धारक/निर्यातदार, पुरवठादार-सह-समन्वयक आणि ट्रॅमाडोल गोळ्यांचा गुप्त उत्पादक यांचा समावेश असलेल्या तीन प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली.

ट्रॅमाडोल आणि टॅपेंटाडोल ही कृत्रिम अफीमयुक्त वेदनाशामक औषधे आहेत, जी मध्यम ते तीव्र वेदनांच्या व्यवस्थापनासाठी वैद्यकीय देखरेखीखाली मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. गैरवापराची शक्यता आणि व्यसनाधीनतेच्या धोक्यामुळे ही दोन्ही औषधे कठोर नियामक नियंत्रणांच्या अधीन आहेत. ट्रॅमाडोलला नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, 1985 अंतर्गत सायकोट्रॉपिक पदार्थ म्हणून सूचीबध्‍द करण्यात आले आहे तर टॅपेंटाडोल जरी सध्या एनडीपीएस कायद्यानुसार  सूचीबध्‍द  नसले तरी ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स कायदा आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार त्यावर कठोरपणे नियंत्रण ठेवले जाते. या औषधांचे अवैध उत्पादन, गैरवापर आणि तस्करी ही एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या आहे आणि त्यांचा संबंध अनेकदा संघटित आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी नेटवर्कशी जोडला गेला आहे.

या कारवाईद्वारे डीआरआयने मादक पदार्थांचे अवैध उत्पादन, साठवणूक, लपवाछपवी आणि निर्यात यांचा प्रयत्न करणाऱ्या एका संघटित नेटवर्कला प्रभावीपणे उद्ध्वस्त केले आहे.



#DRI, # RevenueIntelligence, # DrugBust, # IllegalDrugManufacturing, # Tramadol, # Tapentadol, # DrugTrafficking, # NarcoticsControl, # NDPSAct, # DrugSeizure, # Maharashtra, # Ambernath, # Mumbai, # Nigeria, # IllegalExport, # DrugSmuggling, # OrganisedCrime, # AntiDrugOperation, # CustomsIntelligence, # PublicHealth, # नशामुक्तभारत, # अंमलीपदार्थविरोधीकारवाई, # महाराष्ट्र, # अवैधऔषधनिर्मिती, # औषधतस्करी, # डीआरआय, # अंमलीपदार्थतस्करी,

You can share this post!

0 Comments

Leave Comments