पुणे दि.१९ जाने.२०२६
बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र व पुणे महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने, मकर संक्रांतीचे औचित्य साधून,पुणे शहरातील महिला कलाकारांचा स्नेहमेळावा व त्या निमित्ताने हळदी कुंकू सामारंभ -मकरसंक्रांत वाण वाटप आणि फक्त महिला कलाकारांसाठी गेम शो - होम मिनिस्टर सायं ५ ते९ या वेळात महिला कलाकारांच्या प्रचंड उत्साहात जल्लोषात संपन्न झाला.महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिर कॅफेटेरिया मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,शेकडो महिला कलाकारांनी यात सहभाग घेऊन या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
या स्नेहमेळाव्यात चित्रपट, मालिका,नाटक, लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, लोकसंगीत, साहित्य, तसेच कलाक्षेत्राशी संबंधित महिला कलाकार भगिनींचा विलक्षण सहभाग होता,खास पपेट शो चे विशेष सादरीकरण करणाऱ्या करणाऱ्या,प्रसिद्ध सिने अभिनेत्री चैताली माजगांवकर-भंडारी यांनी दोन तास महिला कलाकार भगिनींसाठी गेम शो व होम मिनिस्टर कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.महिलांनीही होम मिनिस्टर कार्यक्रमाचा आनंद घेतला.पहिल्या पाच विजेत्यांना खास बक्षिसे देण्यात आली, तसेच लकी ड्रॉ च्या माध्यमातून सुंदर अशा नथी, नक्षिदार ठूशी, इम्पोर्टेड मेकअप व्हॉनेटी, इम्पोर्टेड बेडशीट्स, तब्बल १२ मानाच्या पैठणी साड्या,अशी ४० लकी ड्रॉ बक्षिसे ही मान्यवरांच्या शुभहस्ते काढण्यात आली.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते, जगद्गुरू श्री तुकोबाराय विश्व कल्याण मिशन चे संस्थापक व अयोध्या येथील श्रीरामल्ला गर्भगृहा समोर किर्तन करणारे एकमेव आंतरराष्ट्रीय ख्यातीचे किर्तनकार डॉ.चेतनानंद महाराज पुणेकर यांची विशेष उपस्थिती लाभली ते म्हणाले की घरात आणि चित्रपट, मालिका, नाटक, रंगमंचावर प्रचंड कष्ट करणाऱ्या कलाकार भगिनींनी स्वतः साठी वेळ देऊन स्वतः चे जीवन आनंदी, प्रफुल्लीत वातावरणात,तुकोबाराय व संतांच्या शिकवणीचे आचारण करून संस्कारशील पध्दतीने जगल्यास त्याचे चांगले सकारात्मक परिणाम होईल, प्रपंचातून परमार्थ साधून समाज आणि पर्यायाने आपले राष्ट्र,देश समृद्ध होईल,त्या साठी स्री शक्तीचे अधिक महत्व आहे त्या साठी महिला कलाकारांना अधिक सशक्त करणे आवश्यक आहे.या वेळी सामाजिक कार्यकर्त्या भू माता ब्रिगेडच्या संस्थापक -अध्यक्ष बीग बॉस फेम मा. तृप्ती ताई देसाई म्हणाल्या की मी कायमच महिला कलाकारांच्या पाठीशी उभी आहे.महिलांनी विशेषत: माझ्या कलाकार महिलांनी कायम स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत बालगंधर्व परिवाराच्या कार्यक्रमात सहभाग होऊन स्वतः ला फिट ठेवण्यासाठी कायम प्रयत्नशील असले पाहिजे.
या स्नेहमेळाव्या निमित्त बालगंधर्व परिवार ट्रस्ट चे संस्थापक -अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व आभार मानले श्री मेघराज राजेभोसले म्हणाले की कलाक्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या सर्वच महिला भगिनींच्या सर्वांगीण विकासासाठी व महिला कलाकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी बालगंधर्व परिवार महिला ब्रिगेड व बाप परिवार कायमच काम करत राहिन, आमच्या बालगंधर्व परिवार ट्रस्ट च्या माध्यमातून बालगंधर्व रंगमंदिराचा तीन दिवसीय भव्य महोत्सव साजरा केला जातो त्या सोहळ्याचे वैभव म्हणजे च आमच्या या सर्व महिला कलाकार, महिला ब्रिगेड आहे,एखादे कुटुंब आनंदी रहाण्यासाठी त्या परिवारातील महिला जशी आनंदी असणे गरजेचे आहे तसेच कलाक्षेत्राला वैभवशाली करण्यासाठी महिला कलाकारांचा आनंद महत्त्वाचा आहे असे मेघराज राजेभोसले म्हणाले.
सदर प्रसंगी आगामी मराठी चित्रपट जब्राट चे प्रमोशन व साप्ताहिक सामाजिक आढावा च्या वेबसाईट चे अनावरण डॉ.चेतनानंद महाराज पुणेकर,मा. तृप्तीताई देसाई ,मा.मेघराज राजेभोसले,मा . विनायक कालेकर व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रसिद्ध गजानन ज्वेलर्सच्या सौ.गौरीताई पवार,मा.मंजिरी पवार, प्रसिद्ध सी.ए.डॉ.केतनजी जोगळेकर,अलविरा मोशन एन्टरटेन्मेंट च्या सी.ई.ओ.प्रसिध्द अभिनेत्री, निर्माती मा.दिपालीताई कांबळे, पुणे महानगरपालिकेच्या मा.अलका गुजनार,मा.सौ.मायाताई चेतनानंद महाराज पुणेकर,एम. आर बी.फाऊंडेशन च्या सौ.हेमलता मघेराज राजेभोसले, सामाजिक कार्यकर्ते मा.प्रशांतदादा देसाई,सामाजिक आढावा या लोकप्रिय साप्ताहिकाचे संपादक, पत्रकार, लेखक मा.श्री.विनायकजी कालेकर,एम आय टी चे मा.डॉ.महेश थोरवे,महाराष्ट्र लेडीज असोसिएशन एम.एल.ए.च्या संस्थापक मा.अभिलाषा बेलुरे, सहयोग व्हेंचर च्या मा.सपना काकडे,लेक माहेरचा कट्टा च्या मा.सारिका ढोणे, जेष्ठ अभिनेत्री जयमाला ताई इनामदार, जेष्ठ अभिनेत्री रजनी भट, जेष्ठ अभिनेत्री मंजूषा जोशी,दिनांक ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या आगामी मराठी चित्रपट जब्राट च्या निर्मात्या मा.प्रगती कोलगते पाटील, प्रसिद्ध अभिनेत्री,निर्माती मा.स्मिता मधूकर,पुणे पोलीस महिला दक्षता समिती सदस्य मा.लतिका शिंदे,सिने अभिनेत्री मा.स्वाती जूनघरे, महिला रायफल शूटर मा.अश्वीनी गुंजाळ,सामाजिक कार्यकर्ते मा.सुहास साठे,मा.संदिप सकट,मा.आदित्य दिपक खांदवे,इत्यादी मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.
महिलांच्या स्नेहमेळाव्यात प्रसिद्ध रिल स्टार हिंदवी पाटील,निर्माता श्री मिठू पवार, अभिनेत्री वनमाला बागूल व अभिनेत्री स्मिता मधूकर, अभिनेत्री सौ.स्वाती धोकटे, निर्माते श्री .विनोद धोकटे, निर्माते श्री. अरूण गायकवाड,निर्माता श्री. अजिंक्य झांबरे,अभिनेत्री मृणाल लोणकर, लावणी सम्राज्ञी वर्षा संगमनेरकर, वर्षा जगताप,सौ.माधवी सातपूते,हेमा कोरबरी, अभिनेत्री हेमा पवार, नृत्यांगना सोनल ढमाले,रंगावलीकार उमेश मोडक, व्यवस्थापक रविराज खुडे, यांनी भेटवस्तू व मदतीचा हात देऊन बालगंधर्व परिवार ट्रस्ट ला उपकृत केले,
बालगंधर्व परिवार ट्रस्ट चे सर्व कार्यकारिणी सदस्य,सौ.शिल्पा भवार ,श्री.शंकर घोडेराव श्री.विनायक कडवळे, श्री . शशिकांत कोठावळे श्री.अमर पुणेकर, श्री.जितेंद्र वाईकर, श्री.संतोष उभे,सौ.दिपा माथवड,सौ.जूई सोनटक्के,सौ.आरोही पाटील, अभिनेत्री आसावरी तारे, तसेच बालगंधर्व रंगमंदिराचे सर्व कर्मचारी महिला सुरक्षा रक्षक, महिला स्वच्छता कर्मचारी,या सर्वांनीच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले,
प्रसिद्ध निवेदिका बालगंधर्व परिवार ट्रस्ट च्या प्रवक्त्या सौ.शोभा कुलकर्णी, प्रसिद्ध निवेदक अभिनेता , बालगंधर्व परिवार ट्रस्ट चे उपाध्यक्ष.श्री. पराग चौधरी, प्रसिद्ध गायक- निवेदक बालगंधर्व परिवार ट्रस्ट चे सचिव.श्री. चित्रसेन भवार या तिघांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर बालगंधर्व परिवार ट्रस्ट चे खजिनदार श्री अनिल गुंजाळ अण्णा यांनी उपस्थितांचे आभार मानले, अतिशय जल्लोषात महिला कलाकार स्नेहमेळावा, हळदी कुंकू सामारंभ, तिळगूळ वाटप व होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला. अशी माहिती श्री.चित्रसेन भवार, सचिव, बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र यांनी दिली
Vidya , January 10, 2026
Well Done.